Monday, February 26, 2024

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!

चुकणारे शब्द – बरोबर शब्द

स्त्रि – स्त्री – स्त्रियांना (अनेकवचन)
तथापी – तथापि
परंतू – परंतु
आर्शिवाद, आशिर्वाद – आशीर्वाद
दिपावली – दीपावली
हार्दीक – हार्दिक
मैत्रिण – मैत्रीण (एकवचन), मैत्रिणी (अनेकवचन)
जाणिव – जाणीव (एकवचन), जाणिवा (अनेकवचन)
उणिव – उणीव (एकवचन) उणिवा(अनेकवचन)
पारंपारीक, पारंपारिक – पारंपरिक
तिर्थप्रसाद – तीर्थप्रसाद
शिबीर – शिबिर
शिर्षक – शीर्षक
मंदीर – मंदिर
कंदिल – कंदील
स्विकार – स्वीकार
दिड – दीड
परिक्षा – परीक्षा
सुरवात – सुरुवात
सुचना – सूचना
कुटूंब – कुटुंब
मध्यंतर – मध्यांतर
कोट्याधिश – कोट्यधीश
विद्यापिठ – विद्यापीठ
विशिष्ठ – विशिष्ट
अंध:कार – अंधकार
अंधःश्रद्ध – अंधश्रद्धा
आगतिक – अगतिक
मतितार्थ – मथितार्थ
अणीबाणी – आणीबाणी
अल्पोपहार – अल्पोपाहार
कोट्यावधी – कोट्यवधी
तत्व – तत्त्व –
महत्व – महत्त्व
व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्त्व
उध्वस्त – उद्ध्वस्त
चातुर्मास- चतुर्मास
निघृण- निर्घृण
मनस्थिती- मनःस्थिती
पुनर्स्थापना- पुनःस्थापना
मनःस्ताप – मनस्ताप
तात्काळ – तत्काळ
सहाय्य, सहाय्यक – साह्य, सहायक
शुभाशिर्वाद – शुभाशीर्वाद
तज्ञ – तज्ज्ञ
सर्वोत्कृष्ठ – सर्वोत्कृष्ट
अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक – अल्पसंख्याक, बहुसंख्याक
औद्योगीकरण, भगवेकरण- उद्योगीकरण, औद्योगिकीकरण, भगवीकरण
महाराष्ट्रीयन – महाराष्ट्रीय
सृजन, सृजनशील, सृजनशीलता – सर्जन, सर्जनशील, सर्जनशीलता
शिर – शीर (डोके)
शिर – शीर (रक्तवाहिनी)

उपाहार – उपहार (भेट)
उपहार – उपाहार (नाश्ता)
अट्टाहास – अट्टहास
अविष्कार – आविष्कार
आनुवंश, अनुवंशिक – अनुवंश, आनुवंशिक
क्रिडा – क्रीडा
सांप्रदाय, संप्रदायिक – संप्रदाय, सांप्रदायिक
सूज्ञ – सुज्ञ
धिःकार – धिक्कार
सोज्वळ – सोज्ज्वळ
केंद्रिय – केंद्रीय
केंद्रीत- केंद्रित
नाविन्य – नावीन्य
पाश्चात्य – पाश्चात्त्य
पाश्चिमात्त्य – पाश्चिमात्य
पितांबर – पीतांबर
निर्भत्सना – निर्भर्त्सना

Thursday, November 23, 2023

पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत..

पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत म्हणून सरकारचे विशेष अभिनंदन......
🪷श्री. अमायी महालिंगा नाईक🪷
केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता. पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा...

मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणं आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली.
 
भटांच्या शेतात मजुरी करायची, आणि घरी आलं की चार पाच वातींचे दिवे घेऊन बोगदा खोदायला निघायचं. कधीकधी हे काम रात्री 9 पर्यंत चालायचं. एक बोगदा 20 मीटर पर्यंत खोदल्यावर कोसळला. मग दुसरा तिसरा करत चार बोगदे कोसळले, पण नाईकांची जिद्द थोडीसुद्धा कोसळली नव्हती.

शेवटी पाचवा बोगदा खोदायला सुरुवात केली. टेकडी आणि पाणी दोघांनीही ह्यांच्यापुढं हार मानली, आणि 35 मीटर खोडल्यावर एक पाण्याचा झरा लागला. सुपारीच्या खोडाचा पाईप सारखा वापर करून ते पाणी घरापर्यंत आणलं. पाणी साठवायला तिथं मोठा हौद तयार केला.

काही वर्षांपूर्वी बघितलेल्या एका वेड्या स्वप्नाच्या शोधात सुरू झालेला प्रवास एकट्यानं केला. लिहिताना किंवा वाचताना जरी हे सगळं एवढं सहज वाटत असलं, तरी नाईक यांनी ऑलम्पिकच्या स्विमिंग पुलापेक्षा दीड पट मोठा बोगदा खोदला होता. सतत आठ वर्षं आणि सुमारे 23000 तास काम करून...

पाण्याची किंमत कळायला प्रत्येकाच्या वाट्याला एवढा संघर्ष का यावा?, असं वाटतं कधीतरी. नाईकांच्या शेतात एक थेंब पाण्याचा अपव्यय होत नाही. पुनर्वापर केला जातो.
आज नाईक यांच्या शेतात 300 पेक्षा जास्त सुपारीची, 75 नारळाची झाडे, 150 काजूची झाडे, 200 केळीची आणि मिरचीची झाडं आहेत. संपूर्ण सेंद्रिय शेती आहे, आणि ऊर्जेचा वापर शून्य. 

आज वयाची सत्तरी ओलांडली तरी नाईक शेतातली सगळी कामं आणि कष्ट स्वतः करतात. काल त्यांना कृषी विषयातला पद्मश्री जाहीर झालाय.

शिक्षण, तंत्रज्ञान, जमीन आणि साधनसंपत्ती यांपैकी काहीही नसताना निखळ मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यांवर मात करून अशक्य गोष्टी वास्तवात बदलता येतात, त्यांनी सिध्द केलंय.
औद्योगिक महासत्ता होण्याच्या आपण कदाचित जवळ असू; पण कृषिप्रधान देश कृषी महासत्ता होण्यासाठी आपल्या सगळ्यांना नाईकांएवढे नाहीत, पण थोडेतरी प्रयत्न करावे लागणार आहेत...                          🌸🌸🌸

जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता
 तेव्हा काय होते?

१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.
१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
१२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.
१३) या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात,
हे पण समजते.🤔
१४) प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे समजायला लागते.
१५) हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
१६) जिवन जगण्याची नवी उमेद,एक ऊर्जा निर्माण होते.
१७) आयुष्याच्या प्रति संवेदनशील भावना निर्माण होते.
१८) एकमेकांच्या सुख:दुःख ची तीव्रता कळते.
१९) करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो...!
२०) आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं.

*📖 चला मग आयुष्य सुंदर आणि सक्षम करण्यासाठी जसं होईल तसं वेळ काढून पुस्तकं वाचूया जेणें करून आपलं जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध बनेल!
#संकलीत

Monday, April 26, 2021

एकलव्य बुक क्लब

*एकलव्य बुक क्लब*

*आता घरबसल्या वाचू शकता २०० पेक्षा अधिक पुस्तके.*

दिलेल्या नंबर वर पुस्तकाचं नाव व्हाट्सअप वर पाठवा. ३० मिनिटांमध्ये पुस्तकाची PDF तुमच्याजवळ असेल. 

अनंत -  +919657838826
प्रवीण - +918286644504
अंकुश - +918625920606
वैभव - +919552841996

*पुस्तकांची यादी*

१)पाझर-अण्णाभाऊ साठे
२)मृत्युंजय
३)छावा
४)झुंज
५)मावळ
६)शिवरायांचे खरे शत्रू कोण
७)रावण संहिता-हिंदी
८)मी पाहिलेले यशवंतराव
९)कृष्णकाठ-यशवंतराव चव्हाण
१०)सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय
११)अधर्म युद्ध -गिरीश कुबेर
१२)गरुड झेप- रणजित देसाई
१३)मनोवेध -वैजयंती डांगे
१४)मधली भिंत-जनार्धन शिर्के
१५)साहित्याचा गाव-आनंद यादव
१६)झूल-भालचंद्र नेमाडे
१७मध्यरात्र-वी.स.खांडेकर
१८)दोस्त-व.पु.काळे
१९)देखणी-भालचंद्र नेमाडे(कविता संग्रह)
२०)स्वर्गाच्या वाटेवर-सुधा मूर्ती
२१)परीघ-सुधा मूर्ती
२२)प्रकाश वाटा-प्रकाश आमटे
२३)भुताचा जन्म-द.मा.मिरासदार
२४)खिल्ली-पु.ल.देशपांडे
२५)गझल-सुरेश भट
२६)उन्हाच्या काटाविरुद्ध-नागराज मंजुळे
(कविता संग्रह)
२७)बालगंधर्व
२८)कांचनमृग
२९)ययाती- वी.स.खांडेकर
३०)यज्ञकुंड-वी.स.खांडेकर
३१)भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म
३२)डॉ. बाबासाहेब आंबेडकर-धनंजय किर
३३)युगंधर-शिवाजी सावंत
३४)जाती उदम
३५)पानिपत
३६)व्यक्ती आणि वल्ली
३७)माझ्या मानमर्जीतील कविता
३८)हिंदू जगण्याची अडगळ-भालचंद्र नेमाडे
३९)वाईज अँड अदर वाइज-सुधा मूर्ती
४०)बटाट्याची चाळ-पु.ल.देशपांडे
४१)माझा लढा-एडॉल्फ हिटलर
४२)माझ्या बापाची पेंड-द.मा.मिरासदार
४३)कर्मवीर भाऊराव पाटील
४४)नवरा म्हणावा आपला-व.पु.काळे
४५)तमस-भीष्मा साहाणी
४६)आमचा बाप आणि आम्ही-नरेंद्र जाधव
४७)एक होता कार्व्हर-वीणा गव्हाणकर
४८)सती-साने गुरुजी
४९)रामाचा शेला-साने गुरुजी
५०)गोप्या-साने गुरुजी
५१)इतिहासाचार्य राजवाडे-साने गुरुजी
५२)कारगिल का घडलं
५३)साहित्यिकांचा गाव-आनंद यादव
५४)कांचनमृग-रणजित देसाई
५५)गोष्टीच गोष्टी-द.मा.मिरासदार
५६)स्वप्नातील चांदणे-रत्नाकर मतकरी
५७)स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं
५८)अमृतवेल-वी.स.खांडेकर
५९)सश्याचे शिंहावलोकन-वी.स.खांडेकर
६०)संकेत-रणजित देसाई
६१)अमोल गोष्टी-साने गुरुजी
६२)अश्रू-वी.स.खांडेकर
६४)सखी-व.पु.काळे
६५)रिकामा देव्हारा-वी.स.खांडेकर
६६)बेलवन-व्यंकटेश माडगूळकर
६७)झोंबी-आनंद यादव
६८)झोपाळा-व.पु.काळे
६९)खडे आणि ओरखडे-मिरासदार
७०)अभोगी-रणजित देसाई
७१)टल्लीची शाळा
७२)कला म्हणजे काय- साने गुरुजी
७३)महात्मा गांधी-सिताकांत
७४)मिरी-साने गुरुजी
७५)दुर्दैवी-साने गुरुजी
७६)कुरल-साने गुरुजी
७७)कर्मचारी-व.पु.काळे
७८)प्लेझर बॉक्स-व.पु.काळे
७९)गरुडझेप-रणजित देसाई
८०)मायाबाजार-व.पु.काळे
८१)जिवलग-कादंबरी
८२)खेळविज्ञानाचे-बालकलाकृती
८३)गूढ भारताचा शोध-अनुवादि
८४)घरभिंत-आनंद यादव
८५)विश्राम-साने गुरुजी
८६)अमोल गोष्टी-सानेगुरुजी
८७)उल्का-वी.स. खांडेकर
८८)ढगा आडचे चांदणे-वी.स.खांडेकर
८९)गुदगुल्या-वी.स.खांडेकर
९०)शेकरा-रणजित देसाई
९१)अपूर्वाई-पु.ल.देशपांडे
९२)गुण गाईन आवडी-पु.ल.देशपांडे
९३)झाड लावणारा माणूस-माधुरी पुरंदरे
९४)महाश्वेता-सुधा मूर्ती
९५)महात्मा फुले समग्र वाङ्मय
९६)बत्ताशी आणि इतर कथा-प्र.के.अत्रे
९७)शिक्षणाची राखरांगोळी
९८)देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-प्रबोधनकार ठाकरे
९९)विवेकानंद-दाभोलकर
१००)मी नास्तिक का आहे-भगतसिंग
१०१)जेव्हा मी जात चोरली होती-बाबुराव बागुल
१०२)फकिरा-अण्णाभाऊ साठे
१०३)गुलामगिरी-महात्मा फुले
१०४)माझे सत्याचे प्रयोग-महात्मा फुले
१०५)श्यामची आई-साने गुरुजी
१०६)महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक
१०७)छत्रपती शिवाजी महाराज-प्र.न.देशपांडे
१०८)महात्मा जोतीबा फुले
१०९)सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय
११०)मलाला-बाबा भांड
१११)वपुर्झा-व.पु.काळे
११२)पाणपोई-व.पु.काळे
११३)काळे पाणी-सावरकर
११४)बनगरवाडी-माडगूळकर
११५)पूर्वाभास-सोनाली सावंत
११६)समज गैरसमज-दत्तात्रय निकम
११७)खगोल-एक अनुत्तरिय प्रश्न
११८)काळोखातील प्रकाश-नरेंद्र वाकोडे
११९)पावसाचं वय-कविता संग्रह
१२०)मनुस्मृती-अनुवादित
१२१)अब्राहम लिंकन
१२२)पानिपतची बखर
१२३)पत्री-साने गुरुजी
१२४)कडू आणि गोड-गंगाधर गाडगीळ
१२५)योद्धा संन्याशी- वसंत पोतदार
१२६)वंश आणि वंशवाद-अनुवादित
१२७)टर्निंग पॉईंट- अब्दुल कलाम
१२८)ब्रॅण्डिंची बॉटल-अत्रे
१२९)धागे-गुलजार
१३०)मुलखावेगळा राजा
१३०)अफजल खानाचा वध
१३१)हुतात्मा- दामोदर चाफेकर
१३२)मला दिसलेली अमेरिका-अरविंद माने
१३३)शांभवी-श्रीनिवास कशाळीकर
१३४)अडम-रत्नाकर मतकरी
१३५)सेवाग्राम ते शोधग्राम-अभय बंग
१३६)झेंडूची फुलं-अत्रे
१३७)ज्ञानेश्वरी
१३८)कोण होते....?(दाभोलकर-पानसरे-कलबर्गी)
१३९)शंभूराजे-दामोदर मगदूत
१४०)चक्रम कोण नाही?
१४१)टारफुला-शंकर पाटील
१४२)वळीव-शंकर पाटील
१४३)अनोळख -शांता शेळके
१४४)वारी-माडगूळकर
१४५)जातककथा-धर्मनंद कोसंबी
१४६)काळी जोगीन-नारायण धारप
१४७)भगवान बुद्ध
१४८)चकाट्या-मिरासदार
१४९)पावनखिंड-रणजित देसाई
१५०)धन अपुरे-रणजित देसाई
१५१)माझा गाव-रणजित देसाई
१५२)कमोदीनी-रणजित देसाई
१५३)वारसा-रणजित देसाई
१५४)बंधीजीवन-शचिंद्रनाथ संण्याल
१५५)बजिंद-गणेश माणुगडे
१५६)आयुष्याचे धडे -सुद्धा मूर्ती
१५७)भारतीय संविधान
१५८)मिर्झा गालिब
१५९)उपरा-लक्ष्मण माने
१६०)मन निरभ्र व्हावं-आ ह साळुंखे
१६१)तुझ्या सह तुझ्या विना-आ ह साळुंखे
१६२)मित्रांना शत्रू करू नका-आ ह साळुंखे
१६३)कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा
१६४)प्रबोधन ठाकरे खंड
१६५)बौद्ध दर्शन
१६७)अग्निपंख-अब्दुल कलाम
१६८)अछूत-दया पवार
१६९)बलूत-दया पवार
१७०)आंबेडकर चळवळ संपली आहे
१७१)इधोस
१७२)किमयागार
१७३)राजश्री शाहू महाराज
१७४)गावगाडा
१७५)ग्रामगीता-तुकडोजी
१७६)महात्मा फुले-चरित्र
१७७)कोल्हाट्याची पोर
१७८)जागत्या-दया पवार
१७९) द अलकेमिस्ट
१८०)भारतातील विवाहसंस्था
१८१)महानायक
१८२)मुसफिर-अच्युत गोडबोले
१८३)युगंधर
१८४)संध्याकाळच्या कविता-कवी ग्रेस
१८५)सुब्बना
१८६)यज्ञकुंड
१८७)रुपमहाल-रणजित देसाई
१८८)टॅक्सी
१९०)वारसा-देसाई
१९१)प्रेम
१९२)साकळ-बनहट्टी
१९३)आई विरुद्ध बाई
१९४)रक्षा-स्मिता दामले
१९५)अर्थाच्या शोधत-नितीन कोत्तापल्ले
१९६)इंटिमेंट-वपु
१९७)अहं
१९८)अघोर-उत्तम मोहितकर
१९९)आभास हा -मंदार कात्रे
२००)मस्तानीचा बाजीराव
२०१)मी लडाची मैना तुमची
२०२)राऊ-ना.स.इनामदार
२०३)नटरंग-आनंद यादव
२०४)वारणेचा वाघ-अण्णाभाऊ साठे
२०५)ताई मी कलेक्टर व्हयनू-राजेश पाटील IAS

*_वाचनाची आवड असलेल्यांनी वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता हा मेसेज जरूर पुढे पाठवा_*

*_Stay_Home_ _Stay_ _Safe_*

Tuesday, September 10, 2019

केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठीची अर्हता, नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना व केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी

*आगामी केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठीची अर्हता, नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना व केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी*
       जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी 1994 मध्ये केंद्र प्रमुखाचे पद निर्माण करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या 10 प्राथमिक शाळांवरील नियंत्रणाकरिता केंद्रप्रमुख पद असते. केंद्र प्रमुखांची रिक्त पदे भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांनी 3 सप्टेंबर 2019 च्या पत्राद्वारे सर्व जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे. प्रस्तुत लेखात केंद्र प्रमुख परीक्षेची सविस्तर माहिती दिली असून ती लक्षपूर्वक वाचावी. plz share
          केंद्र प्रमुखांची रिक्त पदे 10 जून 2014 शासन निर्णयानुसार सरळसेवेतून 40 टक्के, विभागीय परिक्षेद्वारे 30 टक्के व पदोन्नतीने 30 टक्के पदे लवकरच भरली जाणार आहेत.तसेच ही पदे भाषा विषय, गणित व विज्ञान आणि सामाजिकशास्त्रे अशा समान प्रमाणात भरण्यात येणार आहेत.
         *केंद्र प्रमुख पदासाठीची अर्हता*
            केंद्र प्रमुख पदाची अर्हता महाराष्ट्र शासनाच्या 10 जून 2014 च्या अधिसूचनेद्वारे पुढीप्रमाणे ठरविण्यात आली आहे.
   *सरळसेवा परीक्षा केंद्र प्रमुख अर्हता*
*1.वयोमर्यादा* - 36 वर्षे (जिल्हा परिषदेच्या सेवेत नसलेले)
(मागास प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता असेल.)
*2.पदवी*- विद्यापीठाची किमान 50 टक्के गुणांसह पदवी आणि बी.एड./समकक्ष पदवी
*3.अनुभव* - शासनमान्य पदावरील प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालय/महाविद्यालय यातील किमान 3 वर्षांचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव plz share
   *विभागीय परीक्षा केंद्र प्रमुख अर्हता*
*1.पदवी*- विद्यापीठाची किमान 50 टक्के गुणांसह पदवी आणि बी.एड./समकक्ष पदवी
*2.अनुभव* - ज्यांनी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पदावर किमान 3 वर्षे सेवा केलेली आहे.
*केंद्र प्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण,तयारीचे स्वरूप व संदर्भ पुस्तके*
        केंद्र प्रमुख रिक्त पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 9/9/2019 द्वारे सुधारित व अद्ययावत करण्यात आला असून तो केंद्र प्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे.या पदासाठी 200 गुणांची परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे.
         पेपर क्रमांक एकमध्ये  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
        पेपर क्रमांक दोनमध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहेत.plz share
         केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
     *पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर व डॉ.अनिरुद्ध
        वरील दोन्ही पुस्तके केंद्रप्रमुख परीक्षेच्या पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा समजून परिक्षाभिमुख तयारी  करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.
        तसेच पेपर एकमधील बुद्धिमत्ता चाचणी व गणितासाठी स्वतंत्रपणे के सागर,नितीन महाले,शांताराम अहिरे,सतीश वसे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
       यामधील शिक्षक अभियोग्यतेशी संबधित कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व घटकांवर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात.या घटकाच्या तयारीसाठी डॉ शशिकांत अन्नदाते यांचे "शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी" हे के'सागर पब्लिकेशन्स कडून प्रकाशित पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
         मराठी भाषिक क्षमतेसाठी  के'सागर,बाळासाहेब शिंदे,डॉ.आशालता गुट्टे  यांची पुस्तके अभ्यासावीत.
        इंग्रजी भाषिक क्षमतेसाठी के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे यांची पुस्तके अभ्यासता येतील.plz share
       *पेपर क्रमांक दोन- शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह*
       यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.प्रस्तुत पेपर अभ्यासक्रम पूर्णतः नवीन व केंद्र प्रमुख कामकाजाशी निगडित आहे.
        केंद्र प्रमुख पेपर दोनच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, शिक्षण विषयक सर्व कायदे व योजना,अद्ययावत शासन निर्णय, केंद्रीय व राज्य पातळीवरील शिक्षण विषयक संस्थांचे रचना व कार्य,माहिती तंत्रज्ञान वापर, अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन पद्धती,माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन, शालेय विषयांचे आशयज्ञान व सामान्यज्ञान, संप्रेषण कौशल्य, चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक व क्रीडा विषयक इत्यादी बाबींचा समावेश आहे.प्रस्तुत केंद्र प्रमुख सविस्तर अभ्यासक्रमासाठी 9 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे.plz share
    *केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे
         सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.तसेच केंद्र प्रमुख अभ्यासक्रमाची व्याप्ती व त्यावर घटकनिहाय विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करता येईल.
       तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
1.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - डॉ.शशिकांत अन्नदाते(तिसरी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स
2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(चौथी आवृत्ती)
4.अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र - डॉ.विष्णु शिखरे,नित्यनूतन प्रकाशन
5.अध्ययन अध्यापन पारंपरिक ते आधुनिक - डॉ.गणेश चव्हाण, नित्यनूतन प्रकाशन, पुणे
6.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण - डॉ.मोहन जाधव
7.शैक्षणिक माहिती तंत्रज्ञानसाठी डॉ.ह.ना.जगताप/डॉ.विष्णू शिखरे व डॉ.बी.एम.पाटील यांचे पुस्तक अभ्यासावे.
8.शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप
9.शिक्षणातील नवविचारप्रवाह - डॉ.नीलिमा सप्रे, फडके प्रकाशन
10.सामान्य विज्ञान विषयज्ञान करिता प्रा.अनिल कोलते /चंद्रकांत गोरे यांचे पुस्तक उपयुक्त ठरेल.
11.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
12.सर्व बेसिक एकत्रित सामान्य ज्ञानसाठी विनायक घायाळ/के'सागर यांचे जनरल नॉलेज पुस्तक अभ्यासावे.
13.चालू घडामोडीसाठी प्रा.इद्रीस पठाण(टॉपर 777 पुस्तक)/समाधान निमसरकार/राजेश भराटे/देवा जाधवर यांची पुस्तके अभ्यासावीत.plz share
         केंद्र प्रमुख पेपर क्रमांक एक व दोन चा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत व व्यापक आहे.केंद्र प्रमुख परीक्षेची जाहिरात शासन पातळीवरील हालचाली पाहता(प्राथमिक शिक्षण संचालक यांचे 3 सप्टेंबर 2019 रिक्त जागा मागविण्याचे पत्र, शासन निर्णय 9 सप्टेंबर 2019 द्वारे नवीन अद्ययावत केलेला अभ्यासक्रम)लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे, तसेच ही पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त असल्याने लवकरच परीक्षेद्वारे भरली जातील, तेव्हा केंद्र प्रमुख पदाचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन पात्र शिक्षकांनी सखोल अभ्यासाला त्वरित सुरवात करून परीक्षेतील आपले यश सुनिश्चित करावे.
             *Best of Luck*
(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)

Wednesday, December 19, 2018

सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फायदे

*सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फायदे*.                           सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना  सेवानिवृत्तीनंतर पुढीलप्रमाणे फायदे मिळतात.                             *ग्रॅच्युइटी*.                           .       सेवानिवृत्ती, कमीत कमी ५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर दिलेला राजीनामा, सेवेमध्ये असताना मृत्यू झाल्यास,सेवेमध्ये असताना कायमस्वरूपी अपंगत्व किंवा आजारामुळे नोकरीवरून कमी केल्यास , आस्थापनेकडून दिली जाणारी भेट किंवा बक्षिस याला *ग्रॅच्युइटी* असे म्हणतात.  ही ग्रॅच्युइटी सरकारी तसेच खाजगी कंपन्या,आस्थापना यामध्ये सेवा करणाऱ्या कामगारांना देखील मिळते. ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा त्या त्या  आस्थापना ठरवितात. ६ व्या वेतन आयोगानुसार ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा १०लाख रूपये असून,७ व्या वेतन आयोगानुसार ही मर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्याच्या हालचाली चालू आहेत.                                        .          *ग्रॅच्युइटी किती मिळते?*.                       एकूण सेवा कालावधीची पूर्ण वर्ष.त्या प्रत्येक वर्षाला १५ दिवसांचा , निवृत्तीच्या शेवटच्या महिन्याला मिळणारा पगार.पगारामध्ये मूळ वेतन+ग्रेड पे+ महागाई भत्ता यांचा समावेश होतो. उदा. एकूण सेवा ३०वर्षे.शेवटच्या महिन्यांचा पगार- मूळ वेतन -२०४००.+ ग्रेड पे- २८००.+महागाई भत्ता १४२% -- ३२९४४. म्हणजेच , २०४००+२८००+३२९४४ =५६१४४.                 या पगाराचा १५ दिवसांचा म्हणजे अर्धा  पगार=.  ५६१४४÷२=२८०७२.  याला ३० गुणल्यास(एकूण सेवा कालावधी) =२८०७०×३०=८,१२,१६०/-एवढी ग्रॅच्युइटी मिळेल.                                          .      *प्राव्हिडंट फंड* किंवा *भविष्य निर्वाह निधी*.             ‌. ‌‌.                            कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा कापून जाणारी प्राव्हिडंट फंडाची रक्कम, दरवर्षी मिळणाऱ्या व्याजासह सेवानिवृत्ती पर्यंत जेवढी रक्कम जमा होते.(२००८नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांची १२% व आस्थापना कडूनही १२%रक्कम दरमहा जमा होते) .ती सर्व रक्कम सेवानिवृत्तीनंतर ताबडतोब कर्मचाऱ्याला , किंवा सेवेमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दिली जाते.                                                     *निवृत्तीवेतन* किंवा *पेन्शन*                                ज्या सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्राव्हिडंट फंडांमध्ये आस्थपनाकडून कोणतीही रक्कम जमा केली जात नाही.त्यांच्या वेतनातून कापून गेलेलीच रक्कम व्याजासह त्यांना निवृत्तीनंतर मिळते.त्या कर्मचाऱ्यांना (सरकारी/निमसरकारी) सेवानिवृत्तीनंतर दिले जाणारे वेतन यालाच *पेन्शन* किंवा *निवृत्तीवेतन* असे म्हणतात.१००% निवृत्तीवेतन मिळण्यासाठी कमीत कमी २० वर्षे सेवा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे.त्यापेक्षा कमी सेवा झाल्यास टक्केवारी नुसार निवृत्तीवेतन कमी होते. ६व्या वेतन आयोगानुसार शेवटच्या महिन्याच्या वेतनावर निवृत्तीवेतन काढले जाते.यामध्ये मूळ वेतन,ग्रेड पे, महागाई भत्ता यांचा समावेश होतो.                                       शेवटच्या महिन्याचे मूळ वेतन - २०४००+ ग्रेड पे - २८००= २३२०० .÷ २ (अर्धे वेतन) = ११६०० हे मूळ निवृत्तीवेतन.याच्यावर निर्देशांकानुसार वेळोवेळी लागू असलेला महागाई भत्ता.=१४२ %.म्हणजेच,११६००+१६४७२=२८०७२. हे झाले निवृत्तीवेतन.यामध्ये वेळोवेळी वाढ होत जाते.  (कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला ५०% निवृत्तीवेतन तहहयात मिळत राहते.)                               *रजेचे रोखीकरण (रजेचा पगार)*.                         ५वर्षापेक्षा जास्त  सेवा संपल्यानंतर (कोणत्याही कारणाने) रजा खाते शिल्लक असलेल्या अर्जित रजा (कमाल मर्यादा ३०० ) व अर्धवेतनी (सिक) रजेच्या
शिल्लक रजेच्या १/२ रजा.(याला कमाल मर्यादा नाही). या दोन्ही रजेचे शेवटच्या महिन्याला घेतलेल्या वेतनाएवढ्या  (मूळ वेतन,ग्रेड पे व महागाई भत्ता ) दराने रोखीकरण करून येणारी रक्कम ही त्या रजेचा पगार असतो. कोणत्याही प्रकारे ५ वर्षापेक्षा जास्त सेवा संपल्यानंतर ही रक्कम मिळते.                                     .  *४०% पेन्शन आगाऊ(अॅडव्हान्स)*.                 नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा अनुज्ञेय असलेल्या मूळ निवृत्तीवेतनाची ४०% रक्कम,  (पूर्वी ही रक्कम १/३ होती) एकूण १० वर्षाचे परिगणन करून, एकरकमी आगाऊ दिली जाते .तेवढी रक्कम दरमहाच्या निवृत्तीवेतनातून कमी करून निवृत्तीवेतन दिले जाते. सतत १५ वर्षे निवृत्तीवेतन घेतल्यानंतर जीवित असल्यास , हे ४०% कापलेले मूळ निवृत्तीवेतन पुन्हा वेतनात वर्ग केले जाते. पूर्ण निवृत्तीवेतन (फुल पेन्शन) चालू होते.                                           (यामध्ये  काही बदल झालेले असू शकतात.चूकभूल द्यावी घ्यावी.).                                     .

Sunday, December 10, 2017

अतिशय उपयुक्त अप्लिकेशन

✍ अॅपची शाळा ✍

●अॅपची शाळा
______________________
★Office Lens : 
डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन
〰〰〰〰〰〰〰〰〰
★WPS Office : 
मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ColorNote : 
नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Keep : 
गूगलचं नोंदीसाठी अॅप
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Pocket : 
इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Google Photos :
फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त  
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Pixlr : 
फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ SnapSeed : 
फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ PhotoFunia : 
फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या
〰〰〰〰〰〰〰〰〰
★PicsArt : 
फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह  
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Prisma : 
फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ Sketchbook : 
अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Camera 360 : 
कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Hyperlapse : 
टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Open Camera : 
साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★SmartTools : 
फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार ! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★SensorBox : 
तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Fing फिंग :
तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Parallel Space : 
एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★VLC : 
पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा

MXPlayer : 
स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Saavn / Gaana / Hungama:
गाणी ऐका मोफत ऑनलाइन
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Hotstar / Voot / Sony LIV : 
लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध
〰〰〰〰〰〰〰〰〰
★trackID, Shazam: 
वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप
〰〰〰〰〰〰〰〰〰
★FlightRadar : 
तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये ! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ShareIt, Xender : 
फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय ! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Google Fit :
दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक ठेवा
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Go Launcher / Nova Launcher  : तुमच्या फोनमधील मेन्यूला वॉलपेपर, अॅप्लिकेशनला नवा लुक देण्यासाठी वापरा हे लॉंचर्स, आवडीनुसार थीम,रंग,आयकॉन लावा!  
〰〰〰〰〰〰〰〰〰  ★PrinterShare, PrintHand :
यूएसबी OTG असलेल्या फोनला चक्क प्रिंटर जोडून प्रिंट काढा !
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Android Device Manager : हरवेलला फोन शोधण्यासाठी गूगलचं अॅप
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Softkey Enabler / Simple Control: 
काही कारणाने हार्डवेअर बटणे खराब झाली असतील तर हे अॅप वापरा. नक्की उपयोगी पडतील !
〰〰〰〰〰〰〰〰〰
★World of Goo : 
भन्नाट गेम नक्की खेळून पहा 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Sprinkle Island : 
साधी सोपी गेम पण नक्कीच गंमतशीर
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ Smash Hit : 
येणारे अडथळे फोडत कमीतकमी वेळात पुढे जाण्याची गेम
〰〰〰〰〰〰〰〰〰
★mmVector : 
उत्तम गेम
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Clash of Clans : 
ही प्रचंड यशस्वी ऑनलाइन गेम आहे, ऑनलाइन मित्रांची टिम बनवून दौर्‍य टिम(Clan)वर हल्ला करण्यासारख्या सोयी ह्यात आहेत! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ManuGanu : 
साधी सोपी गेम, सुंदर ग्राफिक्स सोबत
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Flipkart, Snapdeal, Amazon, eBay   : 
ऑनलाइन शॉपिंग
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Facebook Lite : 
कमी हार्डवेअर ताकदीच्या फोन्ससाठी फेसबुक अॅप
〰〰〰〰〰〰〰〰
★Hike Messenger : 
भारतीय मेसेजिंग अॅप (एयरटेल ग्रुप) व्हाट्सअॅपपेक्षा अधिक अनेक दर्जेदार सुविधा, खास भारतीयांसाठी स्टीकर्स !
〰〰〰〰〰〰〰〰
★Opera Max : 
इंटरनेट डाटा वाचवण्यासाठी ओपेराचं अॅप्लिकेशन
〰〰〰〰〰〰〰〰
★Google Indic Keyboard : 
भारतीय भाषांमध्ये टाइप / लिहिण्यासाठी गूगलचा कीबोर्ड
〰〰〰〰〰〰〰〰
★Unified Remote : 
तुमचा पीसी तुमच्या फोनने कंट्रोल करा !
〰〰〰〰〰〰〰〰
★Tablet Remote, RemoDroid : तुमचा अँड्रॉइड फोन दुसर्‍या अँड्रॉइड फोनवरून कंट्रोल करा !! 
〰〰〰〰〰〰〰〰
★mmAZ Screen Recorder : 
फोनच्या स्क्रीनचा व्हिडिओ काढण्यासाठी अॅप
〰〰〰〰〰〰〰〰
★Automatic Call Recorder : 
फोन कॉल्स रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी फ्री अॅप्लिकेशन !
〰〰〰〰〰〰〰〰
★TeamViewer : 
तुमचा कम्प्युटर तुमच्या फोनमधून कंट्रोल करा ! 
〰〰〰〰〰〰〰〰
★AppLock : 
अॅप्लिकेशनला लॉक घालण्यासाठी सर्वोत्तम अॅप
〰〰〰〰〰〰〰〰
★Google Goggles : 
QR कोड स्कॅन करा, भाषांतर करा, पर्यटन स्थळे ओळखा 
〰〰〰〰〰〰〰〰
★SkyMap / StarChart : 
ह्या अॅप्सच्या मदतीने घ्या अवकाशातील ग्रह तार्‍यांचा वेध ! 
〰〰〰〰〰〰〰〰

★ISS Detector : 
International Space Station ची सध्याची स्थिती पाहण्यासाठी अॅप
〰〰〰〰〰〰〰〰
Paytm, FreeCharge, Mobikwik : फोन क्रमांक रीचार्ज करा, पैसे पाठवा/मिळवा, खरेदी करा. 

◆कलात्मक ऍप्स

           तुमच्याकडे कलात्मकता आहे आणि तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल; तर ही काही अॅप्स तुम्हाला तुमची कलात्मकता वाढवण्यासाठी नक्की उपयोगी पडतील. काहीवेळा तितकीशी खास नसलेली काही अॅप्स जास्त रेटिंग घेऊन वर आलेली असतात अन् त्यामुळे काही भन्नाट अॅप्स मागे पडतात. त्यामुळे अशाच काही खास अॅप्सची माहिती...

★फोटोमॅथ

इमेजेसमध्ये असलेली गणितं सोडवण्याचं काम सोपं करायचं असेल, तर फोटोमॅथ तुमच्यासाठी बरेच उपयुक्त आहे. इमेजच्या स्वरूपात असलेल्या गणिताला कॅमेऱ्याने टिपून, या अॅपच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतं. हे गणित कॅमेऱ्याने टिपले की, तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. या अॅपमध्ये कॅलक्यूलेटर देखील आहे.

★डांगो

तुम्ही ईमोजीचा भरपूर वापर करत असाल, तर हे अॅप तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कुठल्याही प्रकारचे मेसेजिंग अॅप चालू केल्यावर डांगो आपलं काम सुरू करतं. तुम्हाला येत असलेल्या मेसेजेसवर योग्यप्रकारे नजर ठेवून, त्या संभाषणासाठी महत्त्वाचे असलेले ईमोजी आणि जिफ्स वापरण्यासाठी तुम्हाला मदत करायचं काम या अॅपमुळे अत्यंत सोपं होतं.

★इंकइट

अनेक कादंबऱ्यांचा संग्रह असलेलं अफलातून अॅप म्हणजे इंकइट! वेगवेगळ्या धाटणीतील या कादंबऱ्या वाचण्यासाठी विनामूल्य आहेत. इंटरनेट नसताना वाचण्यासाठी तुम्ही या कादंबऱ्या डाउनलोड करून ठेऊ शकता. ज्या शैलीतील वाचन तुम्ही नियमितपणे करता, त्या शैलीतील इतर पुस्तकांचे प्रस्ताव तुम्हाला सतत देणारे हे अॅप वाचनासाठी निश्चितच फायदेशीर आहे.

★मूडकास्ट

तुमच्या रोजच्या दिनक्रमावर लक्ष ठेवण्याचं काम हे अॅप करतं. नेहमीच्या सवयींवर लक्ष ठेऊन, नव्या चांगल्या सवयी लावण्यास हे अॅप मदत करतं. थोडक्यात तुम्ही या अॅपवर तुमची रोजची डायरी लिहू शकता. फेसबुकला जोडले जाऊन मूडकास्ट तुमच्या एफबी पोस्टनुसार तुमच्या मूडवर लक्ष ठेवण्यासही सक्षम आहे. याच्याच मदतीने तुमच्या सवयी बदलण्यास ते हातभार लावतं.

★पॉडकास्ट गो

अँड्रॉइड फोनसाठी सर्वोत्तम पॉडकास्ट प्लेअर असं या ऍपला म्हणता येईल. तीन लाखाहून अधिक पॉडकास्ट्स त्यांच्या विविध श्रेणींनुसार तुम्हाला इथे मिळतील. यात ट्रेंडिंग आणि प्रसिद्ध पॉडकास्ट्स शोधणंही फार सोपं आहे. तुम्ही अर्धवट सोडलेले शो किंवा नवे शो यांची वेगळी यादी तयार करायची सुद्धा सोय यात आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

🙏🤝🙏🤝🙏🤝🙏🤝🙏🤝

Featured Post

ज्ञानरचनावादी उपक्रम

ज्ञानरचनावादी उपक्रम          ������������              १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये ...